महापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र सकारात्म आश्वासन मिळाल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

SHARE

महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं. मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली असून, सकारात्म आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ७व्या वेतन आयोगाच्या थकीत २० टक्के रकमेचा हप्ता गणेशोत्सवापूर्वी दिला जाणार आहे. तसंच, इतर मागण्यांबाबतही लवकरच तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन आयुक्तांनी दिलं.

काम बंद आंदोलन

महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीनं दिला होता. याबाबत बुधवारी आझाद मैदानात शेकडो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाविरोधात शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची पालिका आयुक्तांसोबत बैठकी झाली. त्यावेळी या बैठकीमध्ये मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

२० टक्के रकमेचा हप्ता

७व्या वेतन आयोगाच्या करारामुळं निर्माण होणाऱ्या एकूण थकबाकीमधून २० टक्के रकमेचा एक हप्ता गेल्या फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता. दुसरा हप्ता गणेशोत्सवापूर्वी दिला जाणार आहे. तसेच १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कामगार, कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय खर्च केला आहे, त्यांनी दोन लाखापर्यंतची बिले सादर केल्यास त्यांना १५ दिवसांत निर्णय घेऊन पैसे देण्यात येणार आहेत. बायोमेट्रिक हजेरीमधील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील. ६व्या वेतन करारामधील त्रुटी दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रामनाथ झा समितीला वेळ नसल्यानं दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून काम सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.हेही वाचा -

खबरदार! 'नवसाला पावणारा' बाप्पा असा दावा केल्यास कारवाई होण्याची शक्यता

मागण्यांबाबत चर्चा फिस्कटली, उपोषण कायम- शशांक रावसंबंधित विषय
ताज्या बातम्या