SHARE

मुंबईत गणेशोत्सव काळात अधिकाधिक भक्तांना आपल्या मंडळाकडं आणण्यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव प्रयत्न करत असतात. यावेळी मंडळातील बाप्पासाठी साकारलेला देखाव्याची जाहीरात करून, मंडळाचं वेगळेपण  सांगून गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच, अनेक मंडळं भक्तांची गर्दी खेचण्यासाठी 'नवसाचे' मार्केटिंग फंडे वापरले आहेत. 'नवसाला पावणारा', 'इच्छापूर्ती करणारा' अशा टॅगलाइन बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळं वापरताना पाहायला मिळत आहेत. मात्र, या मोठ्या मंडळांप्रमाणं लहान मंडळही ही टॅगलाईन वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे

नवसाला पावणारा

मागील काही वर्षात अनेक मंडळांनी आपल्या बाप्पांना 'नवसाला पावणारा' असं बिरुद लावून भक्तांची गर्दी खेचण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अस करताना अनेक मंडळांकडून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा ओलांडली जात असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. छोट्या मंडळांमध्ये हा फंडा वेगानं पसरत असला तरी अनेक मोठी मंडळेही अशा 'नवसपूर्ण' जाहिराती करण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत, अशा चुकीच्या पद्धतीनं जाहिराती करून पैसा उकळण्याचा वा कोणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास, तसेच नवसाच्या बहाण्यानं एखाद्याला स्वतःच्या जीवास धोका निर्माण करण्यास भाग पाडल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल नाही

अद्याप अशाप्रकारचा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, श्रद्धेवर मनमानीपणाची झालर ओढण्याचा प्रयत्न वाढत असल्यानं कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याची म्हटलं जात आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काम करत असून, शासनानंही यासाठी भरीव योगदान देण्याची गरज असल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.हेही वाचा -

मुंबईतील मुख्य ५ ठिकाणी पार्किंगला मज्जाव

शाळा, शिक्षकांना अनुदान, ३०४ कोटी रुपयांचा खर्चसंबंधित विषय
ताज्या बातम्या