Advertisement

एल्फिन्स्टन ब्रिजच्या कामासाठी शनिवारी, रविवारी विशेष मेगाब्लाॅक


एल्फिन्स्टन ब्रिजच्या कामासाठी शनिवारी, रविवारी विशेष मेगाब्लाॅक
SHARES

एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांची कामं हाती घेण्यात अाली अाहेत. त्यापैकीच महत्त्वाचं असलेल्या एलफिन्स्टन रोड अाणि परळमध्ये पादचारी पूल लष्कराच्या साहाय्यानं उभारण्यात येणार असून त्याचं काम वेगात सुरू अाहे. 

याच कामासाठी शुक्रवारीही मेगाब्लाॅक घेण्यात अाला होता. अाता शनिवारी रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत विशेष मेगाब्लाॅक घेण्यात येणार अाहे. तसंच रविवारी रात्रीही १.३० वाजल्यापासून सकाळी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लाॅक असेल.


मेल, एक्स्प्रेस दादरमध्ये थांबणार नाहीत

शनिवारी होणाऱ्या या विशेष मेगाब्लाॅकमुळे काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांना दादर स्थानकात थांबवले जाणार नाही. वडोदरा एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल, गुजरात मेल अाणि सौराष्ट्र मेल या एक्स्प्रेस दादर स्थानकांत थांबणार नाहीत. अहमदाबाद - मुंबई सेंट्रल या एक्स्प्रेसला बोरीवली स्थानकांत थांबा देण्यात अाला अाहे.

संबंधित विषय
Advertisement