Advertisement

विशेष राजधानी एक्स्प्रेसला मिळाला हिरवा सिग्नल; अडीच तासात नाशिक


विशेष राजधानी एक्स्प्रेसला मिळाला हिरवा सिग्नल; अडीच तासात नाशिक
SHARES

नववर्षाच्या मुहूर्तावर देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई ते नाशिक हे अंतर केवळ एक थांबा घेऊन पूर्ण करता येणार आहे. आज, बुधवारपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून विशेष राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. राजधानीमुळे मुंबई ते नाशिक हे अंतर जवळपास अडीच तासांत पार करणे शक्य होणार आहे.

राजधानी विशेष गाडी (०१२२१ ) सीएसएमटीहून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी ४.१० वाजता सुटेल. सायंकाळी ६. ४५ वाजता नाशिक रोडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दिल्लीला पोहचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झांसी आणि आग्रा कॅन्टोन्मेंट या स्थानकांवर थांबेल. ही विशेष गाडी (०१२२२) दर मंगळवार, गुरूवार, शनिवार आण रविवारी दिल्लीहून दुपारी ४.५५ ला रवाना होईल आणि सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० ला पोहचेल.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता सीएसएमटी-नागरकोईल, एलटीटी-भुवनेश्वर, एलटीटी-पुरी, एलटीटी-विशाखापट्टणम, एलटीटी-हटीया, एलटीटी-गोरखपूर, सीएसएमटी-पटना या आणि अन्य मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या विशेष गाड्यांच्या वेळा आणि आरक्षणासाठी www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच आरक्षण केंद्रावरही या गाड्यांचे आरक्षण करता येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा