रे रोड स्थानकात विशेष घातपात तपासणी

 Mumbai
रे रोड स्थानकात विशेष घातपात तपासणी
Mumbai  -  

हार्बर मार्गावरील वडाळा लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रे रोड रेल्वे स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या आदेशानुसार शुक्रवारी वडाळा लोहमार्ग पोलिसांच्यावतीने विशेष घातपात तपासणी करण्यात आली.

रेल्वेमार्गावर घातपातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर गुप्त यंत्रणा दक्षता घेण्याचा उद्देशाने अॅलर्ट करीत आहेत. 

त्या सूचनांच्या आधारावर हार्बर मार्गवरील रे रोड रेल्वे स्थानकात माटुंगा येथील आरपीएफ डॉगस्कॉड पथकासह डॉग-प्रिन्स, हँडलर किसन जाधव, किशोर पवार यांच्या सहकार्याने घातपात तपासणी करण्यात आली. 

त्याचबरोबर रे रोड स्थानकात एचएचएमडी मशीनच्या सहाय्याने 21 संशयीत इसम, 15 बॅगा तपासण्यात आल्या असून, स्थानकांवरील अडगळीच्या जागा, तिकीट बुकिंग ऑफिस, पादचारी पुलाखालील जागा, उपहार गृह, लोहमार्ग हद्दीतील संपूर्ण जागा काटेकोरपणे तपासण्यात आल्या. मात्र काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल बर्वे, हवालदार मंगेश साळवी, मनोज गुजर, महिला पोलीस नाईक मंजुळा सोळंकी यांनी भाग घेतला होता.

Loading Comments