'मरे'चा पळसदरी ते कर्जतदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

 Pali Hill
'मरे'चा पळसदरी ते कर्जतदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई - मध्य रेल्वेच्या पळसदरी ते कर्जत स्थानकादरम्यान रुळाच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी अप मार्गावर 23 आणि 24 तारखेला विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. 

या दरम्यान, सकाळी 10.20 वाजता आणि 11.30 वाजता सुटणारी खोपोली ते कर्जत लोकल पळसदरी स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर सकाळी 10.55 वाजता आणि 12:05 वाजता सुटणारी कर्जत ते खोपोली लोकल पळसदरी स्थानकापर्यंतच धावणार आहे. तसेच हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (17032) ही गाडी आपल्या निर्धारित वेळपेक्षा 20 ते 30 मिनिटे उशिरा मुंबईला पोहचणार आहे. तसेच एक्स्प्रेस पळसदरी स्थानकावर थांबणार आहे.

Loading Comments