Advertisement

होळीसाठी मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाडया


होळीसाठी मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाडया
SHARES

मुंबईहून होळीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वेतर्फे या कालावधीत २२ विशेष गाडया सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते जम्मू तवी, लखनऊ, एलटीटी ते गोरखपूर, करमाळी आणि सावंतवाडी रोड यादरम्यान या विशेष गाडया धावणार आहेत.


एलटीटी-करमाळी

यामध्ये ०१०४५ एलटीटी-करमाळी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) ही २ मार्चला रात्री १ वाजून१० मिनिटांनी सुटणार असून करमाळीला त्याच दिवशी सकाळी ४ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ०१०४६ करमाळी - एलटीटी २ मार्चला दुपारी २ वाजता सुटेल आणि एलटीटीला रात्री ००.२० पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनेवल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कनकवली, कुडाळ आणि थिविम थांबा देण्यात येणार आहेत.


एलटीटी-सावंतवाडी

तर, ०१०३७ एलटीटी - सावंतवाडी ही गाडी ५ मार्चला रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून सावंतवाडीला त्याच दिवशी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी ०१०३८ सावंतवाडी - एलटीटी ५ मार्चला दुपारी २.०५ वाजता सुटेल आणि एलटीटीला रात्री ००.२० पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनेवल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कनकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहेत.


सीएसएमटी-जम्मू तवी

गाडी क्रमांक ०२१७१ सीएसएमटी-जम्मू तवी साप्ताहिक गाडी २ मार्चला सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता जम्मू तवीला पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ०२१७२ जम्मू तवी-सीएसएमटी ४ मार्चला सकाळी ७ वाजून २५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून २५ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहचेल.


पुणे-पटना

गाडी क्रमांक ०१३४७ पुणे - पटना साप्ताहिक गाडी (४ फेऱ्या)२६ फेब्रुवारी ते ५ मार्चला रात्री ८.२० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पटणाला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ०१३४८ पटणा - पुणे ही २८ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत सायंकाळी ५ वाजून ४५ सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून ०५ वाजता पोहोचणार आहे.


सीएसएमटी-लखनऊ विशेष

तसंच, सीएसएमटी ते लखनऊ विशेष गाडी २७ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत साप्ताहिक ४ विशेष फेऱ्या, एलटीटी ते गोरखपूर ही साप्ताहिक विशेष ४ फेऱ्या २७ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा