Advertisement

होळी निमित्त मध्य आणि कोकण रेल्वेच्या 112 विशेष रेल्वे फेऱ्या

गाड्यांचे आरक्षण रविवारपासून खुले झाले आहे.

होळी निमित्त मध्य आणि कोकण रेल्वेच्या 112 विशेष रेल्वे फेऱ्या
SHARES

होळी सणाच्या निमित्ताने मध्य आणि कोकण रेल्वेने 112 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. गाड्यांचे आरक्षण रविवारपासून खुले झाले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम साप्ताहिक (6 फेऱ्या), पनवेल ते सावंतवाडी (6 फेऱ्या), एलटीटी ते थिविम (6 फेऱ्या), पनवेल ते थिविम (14 फेऱ्या) एलटीटी ते वाराणसी साप्ताहिक (6 फेऱ्या), एलटीटी ते दानापूर (6 फेऱ्या), एलटीटी-समस्तीपूर साप्ताहिक (4 फेऱ्या), एलटीटी ते प्रयागराज (12 फेऱ्या), एलटीटी ते गोरखपूर साप्ताहिक (6 फेऱ्या) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर साप्ताहिक (6 फेऱ्या) चालवण्यात येणार आहे. उर्वरित पुणे विभागातून कोकणासह उत्तर भारतासाठी ही रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 01597 रोहा-चिपळूण विशेष मेमू रोहा येथून 8,9,11,15,16,18,22,23,25,29 आणि 30 मार्चला सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता चिपळूणला पोहोचेल. परतीचा प्रवास (01598) चिपळूण येथून दुपारी 1.45 वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी 4.10 वाजता रोहा स्थानकात पोहोचेल.

थांबे : कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा