Advertisement

मीरा-भाईंदरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी मोफत बसफेरी

MBMC ने 2021 मध्ये मोफत बस प्रवास योजना सुरू केली होती.

मीरा-भाईंदरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी मोफत बसफेरी
SHARES

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाने महिला प्रवाशांना 8 मार्च रोजी मोफत प्रवासाची ऑफर दिली आहे, जो दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. फ्रि प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

MBMC ने 2021 मध्ये मोफत बस प्रवास योजना सुरू केली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये फक्त 11,552 महिला प्रवासी निर्बंधांसह कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत मोफत प्रवासाचा आनंद घेऊ शकले. तथापि, 8 मार्च 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे 21,463 आणि 25,838 महिला प्रवाशांनी मोफत सुविधेचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी नागरी संस्था रुपये 1,43,995 (2021), रुपये 2,73,786 (2022) आणि रुपये 3,09,618 (2023) खर्च झाला आहे.

“आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी प्रशासनाचा हा एक छोटासा उपक्रम आहे. सर्व मार्गांवर चालणाऱ्या बसेस महिलांसाठी मोफत असतील,” असे महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले.

सध्या, नागरी प्रशासनाच्या ताफ्यात एकूण 79 बस आहेत, ज्यात 20 मार्गांवर चालणाऱ्या नियमित, एसी व्होल्वो आणि मिडीचा समावेश आहे. मीरा भाईंदर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (MBMT) प्राधिकरण हळूहळू आपल्या ताफ्यात अधिक बस येत आहेत. 



हेही वाचा

मुंबई-कोल्हापूर मार्गावर लवकरच धावणार 'वंदे भारत'

मुंबईत पॉड टॅक्सी धावणार, 'या' स्थानकांवर थांबणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा