Advertisement

एसटीकडे कुणी पाहीना!


एसटीकडे कुणी पाहीना!
SHARES

मुंबई - राज्य परिवहन मंडळाला मार्च 2016 मध्ये 1927.77 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. याचं कारण म्हणजे प्रवासी कित्येक वेळा एसटीने प्रवास करण्यापेक्षा खासगी बसेसने प्रवास करणं पसंत करतात. 

बस स्थानकावरील गैरसोय, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि कर्मचाऱ्यांकडून होणारी गैरवर्तणूक या कारणांमुळे प्रवासी बाहेर गावी जाताना खाजगी बसेसना प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी राज्य परिवहन मंडळ वेगवेगळ्या उपाय योजना राबविते.

तर दुसरीकडे परिवहन मंडळाला हवं तसं यश मिळत नसल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2014-15 मध्ये 3520 तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या तर 2015-16 मध्ये 3391 तक्रारी केल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा