Advertisement

मराठा क्रांती मोर्चा : ११ दिवसात एसटीला २३ कोटींचा फटका


मराठा क्रांती मोर्चा : ११ दिवसात एसटीला २३ कोटींचा फटका
SHARES

 मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागल्याने याचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चांगलाच बसला. या आंदोलनाची सर्वात जास्त झळ एसटी महामंडळाला बसली आहे. एसटीला या कालावधीत २३ कोटी रुपयांचा फटका बसला अाहे.


३५३ एसटींचं नुकसान

१८ जुलैपासून सुरू झालेले मराठा आंदोलन २३ जुलैला औरंगाबादच्या गंगापूर येथील काकासाहेब या तरुणाने नदीत उडी घेउन आत्महत्या केल्यानंतर अधिकच चिघळले. त्यानंतर मुंबईसह पनवेल, रायगड, पुणे, औरंगाबाद, सोलापूर अशा अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध शहरातील अनेक एसटीचे आगार बंद करण्यात आले. १८ ते २९ जुलै या ११ दिवसात तब्बल ३५३ एसटी बसेसचं नुकसान करण्यात आलं. काही ठिकाणी बसेस जाळण्यात आल्या. यापैकी सोलापुरात सर्वाधिक १३६ बसचं नुकसान झालं आहे. या तोडफोडीमुळे एसटी महामंडळाचं एकूण १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचं नुकसान झालं.  तर हजारो फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे २२ कोटी २ लाख १३ हजार ७४९ रुपयांचा महसुल बुडाला आहे.



हेही वाचा - 

अस्वच्छ प्रसाधनगृहाची तक्रार अाता व्हाॅट्सअॅपवरुन

शिवशाहीच्या धडकेत पादचाऱ्याचा पाय तुटला





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा