लवकरच एसटीचा प्रवास कॅशलेस

 Pali Hill
लवकरच एसटीचा प्रवास कॅशलेस

मुंबई – नोटाबंदीनंतर कॅशलेस इंडियाची घोषणा दिली जात असून, कॅशलेस इंडिया प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य तितके व्यवहार कॅशलेस करण्याचे प्रयत्न सर्वच सरकारी यंत्रणांकडून सुरू झाले आहेत. मग आता एसटी महामंडळतरी कसे मागे राहील. एसटीने कॅशलेस होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटी आरक्षण केंद्रावर पीओएस मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन बसवण्याच्या कामाला सुरूवात झाली असून, आठवड्याभरात दोन आरक्षण केंद्रावर पीओएस मशीन बसणार असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचे मशीन बसवण्यात येणार असून, यासाठी एसटीला फक्त महिना शंभर रूपये भाडे एका मशीनसाठी द्यावे लागणार आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे तिकीट आणि पास काढता येणार आहे. त्यामुळे आता लवकरच एसटी प्रवाशांचा प्रवास कॅशलेस होणार आहे.

Loading Comments