Advertisement

राज्य सरकारनं एसटी थकबाकीचे २६९ कोटी रूपये द्यावे - इंटक

मजुरांनाच्या मोफत प्रवासाचे पैसे मदत व पुर्नवसन खात्याकडून ९४ कोटी ९६ लाख इतकी रक्कम एसटी महामंडळास देणे बाकी आहे.

राज्य सरकारनं एसटी थकबाकीचे २६९ कोटी रूपये द्यावे - इंटक
SHARES

राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्ररप्रांतियांनी आपल्या गावची वाट धरली. या स्थलांतरीत मजुरांना आपल्या राज्यात सोडण्यासाठी एसटी महामंडळानं वाहतूक सेवा पुरवली. राज्य सरकारच्या आश्वासनानुसार ही सेवा या मजुरांना मोफत देण्यात आली. या सेवेसाठी एसटी महामंडळाला प्रवासाचा खर्च राज्य सरकार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळं मजुरांनाच्या मोफत प्रवासाचे पैसे मदत व पुर्नवसन खात्याकडून ९४ कोटी ९६ लाख इतकी रक्कम एसटी महामंडळास देणे बाकी आहे.

पोलीस वारंट, कारागृह वॉरंट, निवडणूक याकरीता एसटी बसच्या खर्चापोटी राज्य सरकारकडून १४७ कोटी रुपये देणं बाकी आहे. विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी २७ कोटी रूपये देणं बाकी आहे. या सर्व देणी मिळून २६८ कोटी ९६ लाख रूपये बाकी आहेत. राज्य सरकारनं हि रक्कम तत्काळ देऊन एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेनं केली आहे.

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना मे महिन्याचं ५० टक्के वेतन कपात केल्यानं निव्वळ वेतन अत्यंत कमी आलेले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविणं शक्य नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. जुन महिन्याचं वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेलं नाही. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत असल्याची माहिती इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.

एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. लॉकडाऊन काळात एसटीला २ हजार ५०० कोटीहून अधिक नुकसान झालं आहे. त्यामुळं एसटी महामंडळाकडं कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी रक्कम उपलब्ध नाही. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं वेतन अदा करणं, डिझेल खर्च व इतर खर्च भागविणं अत्यंत अवघड झालेलं आहे.



हेही वाचा -

Best Mini Ac Bus कोरोनाच्या भीतीनं प्रवासी टाळताहेत बेस्टच्या मिनी एसी बसचा प्रवास

मुंबईच्या या परिसरात दिवसेंदिवस वाढते कोरोनाग्रस्तांची संख्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा