Advertisement

कोकणात जाताय मग 'या' द्रूतगती मार्गाचा वापर करा : पोलिसांचं आवाहन

मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून कोल्हापूर मार्गे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

कोकणात जाताय मग 'या' द्रूतगती मार्गाचा वापर करा : पोलिसांचं आवाहन
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन राज्य महामार्ग पोलिसांनी केलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून कोल्हापूर मार्गे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


'या' मार्गाचा करा वापर

  • रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली-वाकण मार्गाचा वापर करावा. 
  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या वाहनचालकांनी चिपळूनला जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळून रस्त्याचा वापर करावा. 
  • हातखंबा येथे जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप- मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा-राजापूर मार्गावरून जावे. 
  • कणकवलीला जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी-कणकवली गाठावे.
  • मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या कोकणवासीयांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा- कराड-कोल्हापूर-निपाणी- आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जावे. 

गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाय योजना केल्या असून, ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तसंच इतर माहितीसाठी महामार्ग पोलिसांच्या www.highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईन क्रमांक 9833498334 आणि 9867598675 येथे संपर्क साधावा. तसंच 9503211100 आणि 9503511100 या क्रमांकावर संदेश पाठवता येईल, असं महामार्ग पोलिसांकडून कळवण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा