Advertisement

'या' स्थानकाच्या पायऱ्यांना नवं रूप


'या' स्थानकाच्या पायऱ्यांना नवं रूप
SHARES

हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकाच्या पायऱ्यांना नवं रुप देण्यात आलं आहे. सीएसएमटी दिशेकडील जिन्याच्या पायऱ्या दुरवस्थेत होत्या. त्यांची दुरूस्ती करून रविवारी या पायऱ्या वेगवेगळ्या रंगांनी रंगविण्यात आल्या आहेत. येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी एका खासगी कंपनीद्वारे येथील पायऱ्यांना रंग दिला.

आठवा क्रमांक

‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ च्या झोनल रँकिंगच्या सर्वेक्षणानुसार उपनगरी असलेल्या स्थानक (एसजी) मध्ये किंग्ज सर्कल स्थानकानं आठव्या क्रमांकावर पटकावला आहे. तसंच, किंग्ज सर्कल स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि महसूल या ‘एसी २’ विभागातून किंग्ज सर्कलनं दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

भकास स्थानक

स्थानकांची स्वच्छता आणि साफसफाई करणं हे आपलं काम आहे. सुरूवातीला किंग्ज सर्कल स्थानक हे भकास स्थानक म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, या स्थानकाच्या प्रत्येक ठिकाणाला स्वच्छ केलं. त्यामुळं संपूर्ण स्थानक स्वच्छ झालं. स्थानकाच्या शेजारी छोटी बाग तयार केली आहे. मागील दोन रविवार दोन्ही जिन्यांच्या पायऱ्यांना रंग देण्याचं काम करण्यात आलं. त्यानुसार, पायऱ्यांना नवं रुप मिळालं आहे.



हेही वाचा -

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

बाळासाहेबच NDA चे संस्थापक होते, राऊतांनी भाजपला सुनावलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा