1 जूनला साजरा होणार एसटी महामंडळाचा वर्धापन दिन

  Mumbai
  1 जूनला साजरा होणार एसटी महामंडळाचा वर्धापन दिन
  मुंबई  -  

  1 जून 1948 रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर धावलेल्या पहिल्या एसटी बसच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जूनला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापनेस 69 वर्ष पूर्ण होत असून, एसटीचा 69 वा वर्धापन दिन हा परिवहन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यंदा एसटीचा 69 वा वर्धापन दिन हा 250 आगार आणि 609 बसस्थानकांवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांबरोबर साजरा करण्यात येणार आहे.

  स्वच्छ बसस्थानके, स्वच्छ बसेस आणि सौजन्यशील सेवा हे ब्रीद घेऊन यंदाचा एसटीचा वर्धापन दिन साजरा होणार असून, 1 जून रोजी प्रत्येक बसस्थानकावर एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणार आहेत. सुमारे 65 लाख प्रवाशांना सुखरुपपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारी एसटी भविष्यात प्रवाशांच्या विश्वासामुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे उत्तरोत्तर प्रगती करत राहील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी व्यक्त केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.