वन मिनीट ब्रेक प्लीज !

मुंबई..धावती मुंबई...मात्र या सतत धावणाऱ्या मुंबईकरांनी आज एक मिनिटाचा का होइन पण ब्रेक घेतला..खरं वाटत नाही ना..तर ही दृश्य बघा..आता ही दृश्य पाहिल्यावर तुम्ही म्हणाल ही मूलं अचानक आहे त्या स्थितीत स्तब्ध झालीत तरी कशाला? तर ऐका त्यांच्याच तोंडून..

मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेमार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेकडून जिंदा रहो हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. ज्यामध्ये कॉलेजच्या 250 हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

अपघातांचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी रेल्वेकडून जनजागृती राबवण्यात आली ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे..मात्र मुंबईकरांनी हे अमलात आणून रेल्वेला पाठिंबा द्यावा आणि अपघात टाळावे एवढीच अपेक्षा. 

Loading Comments