Advertisement

२ वर्षांत एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

कमी वेतन व अन्य आर्थिक समस्यांमुळं या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय, संपकाळात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये आणखी वाढ झाल्याचं समजतं.

२ वर्षांत एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
SHARES

मार्च २०२० पासून ते आतापर्यंत राज्यातील ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. कमी वेतन व अन्य आर्थिक समस्यांमुळं या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय, संपकाळात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये आणखी वाढ झाल्याचं समजतं. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन महामंडळाकडून देण्यात आले होते. परंतु त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही.

कोरोनाच्या वाढत्या  संसर्गामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागलं आणि महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ही सेवा राज्यात बंदच होती. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. टप्प्याटप्यात एसटीची वाहतूक सुरू झाल्यानंतरही प्रवासी एसटीकडे फिरकले नाहीत आणि उत्पन्न आणखीनच घसरले. परिणामी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणेही कठीण झाले.

वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. यामुळे आणखी मानसिक तणावाखाली आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली. मार्च २०२० पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत १२ कर्मचारी आणि मार्च २०२१ पासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत ११ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

त्यानंतर आतार्पषत आणखी १९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आत्तापर्यंत एकूण ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, लातूर विभाग, नांदेड, यवतमाळ यासह अन्य एसटी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून यामध्ये चालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांचा सहानुभूतिपूर्वक विचार करू, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी डिसेंबर २०२१ मध्ये सांगितले होते. तशी चाचपणी करण्याचे आदेशही एसटी अधिकाऱ्यांना दिले, त्यानंतर मात्र काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा