Advertisement

महिला प्रवाशांनो संकटात 'टॉकबॅक' तुमच्या मदतीला


महिला प्रवाशांनो संकटात 'टॉकबॅक' तुमच्या मदतीला
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून लोकलमध्ये महिलांवरील अत्याचार, अश्लील चाळे, विनयभंग आणि चेनस्नॅचिंग यांचे प्रमाण वाढले आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून आता पश्चिम रेल्वेने लोकलच्या महिला डब्यात टॉकबॅक प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे.


काय आहे ही टॉकबॅक प्रणाली?

लोकलच्या सर्व महिला डब्यांत दरवाजाजवळ एक बटणसोबतच स्पीकरही बसवले जाणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान कोणताही प्रसंग ओढावल्यास महिलांना तातडीने ते बटन दाबून थेट गार्डशी संपर्क साधता येणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तातडीने मदत मिळू शकेल. पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक लोकलमधील महिलांच्या डब्यात ही टॉकबॅक प्रणाली बसवली जाणार आहे.


येत्या दीड वर्षात ही सुविधा उपलब्ध

येत्या दीड वर्षात लोकलच्या महिला डब्यात टॉकबॅकसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. सध्या 16 लोकमध्ये महिलांच्या डब्यात 50 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्हींची संख्या वाढवली जाणार आहे.


हेही वाचा - 

लोकलपाठोपाठ मेट्रो स्थानकावरही महिलेचा विनयभंग

धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा