SHARE

मध्य रेल्वे आणि तांत्रिक बिघाड हे काही मुंबईकरांना नवं नाही. शनिवारी सकाळी देखील घाटकोपर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली. मध्य रेल्वेच्या वाहतूकीच्या खोळंब्याचा सलग दुसरा दिवस असल्याने रोज 'मरे' त्याला कोण रडे अशी काहीसी अवस्था प्रवाशांची झाली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं बंद होती. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर वळवण्यात आली होती. ऐन गर्दीच्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी उपनगरीय लोकल सेवा कोलमडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या