Advertisement

'लोकल'नंतर मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी परळ स्थानकात टर्मिनस

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मोठं टर्मिनर्स उभारले जाणार आहे.

'लोकल'नंतर मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी परळ स्थानकात टर्मिनस
SHARES

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मोठं टर्मिनर्स उभारले जाणार आहे. सध्यस्थितीत परळ स्थानकात लोकलससाठी छोटं टर्मिनस उभारण्यात आलं असून, लोकल गाड्यांचं विभाजन करण्यात आलं आहे. या टर्मिनसचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर-डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) नुकताच रेल्वे बोर्डाकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळं मागील ३ वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

रेल्वेच्या परळ कार्यशाळेच्या परिसरातच मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याआधी २ वेळा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर त्यात काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले. आता कोरोनाकाळात पुन्हा याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बोर्डाकडं पाठविण्यात आला आहे. 

'असं' होणार टर्मिनस

  • संबंधित प्रस्तावानुसार, मेल-एक्स्प्रेस टर्मिनससाठी ५ प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार आहे. 
  • प्लॅटफॉर्म जवळच या गाड्या उभ्या करण्यासाठी आणखी ५ स्टेबलिंग मार्गिकाही बनवल्या जाणार आहेत.
  • मेल-एक्स्प्रेस गाड्यांची व्यवस्थित पाहणी करून त्यात काही तांत्रिक दुरुस्ती करता यावी, यासाठी ५ पिट लाइनही असतील. 
  • डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा व अन्य तांत्रिक मुद्दे सोडवून कामाला गती दिली जाईल. 
  • साधारण ५ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून २०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च अपेक्षित आहे.

स्थानिकांना फायदा

  • मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी परळ टर्मिनस बनल्यास दादर, लालबाग, परळ भागांतील स्थानिकांना त्याचा फायदा मिळेल. 
  • सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटणाऱ्या गाड्या परळ टर्मिनसमधून सुटतील. 
  • उर्वरित ३ टर्मिनसवरील ताणही कमी होईल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा