Advertisement

लॉकडाऊन काळात देशभरात १ हजार १५० टन औषधांचा पुरवठा


लॉकडाऊन काळात देशभरात १ हजार १५० टन औषधांचा पुरवठा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याभरात लॉकडाऊन असताना या लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतुक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही एसटी व बेस्टच्या बस रस्त्यावर धावत आहेत. तसंच, रेल्वेही अत्यावश्यक सेवा पुरवत असून, रेल्वे प्रशासनाकडून कोरोना विरुद्ध लढाई सुरु आहे. 

कोरोनाशी लढायला लागणाऱ्या सामग्रीची वाहतूक सुरु आहे. पश्चिम, मध्य यासारख्या देशभरातील प्रत्येक रेल्वे विभागातून फक्त मालगाड्यांची आणि पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. प्रत्येक विभागातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, काही पीपीई किटची वाहतूक केली जातेय. लॉकडाऊन काळात देशभरात १ हजार १५० टन औषधांचा पुरवठा केला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. फक्त मालगाडी, पार्सल गाडयांची सेवा सुरु आहे.  याद्वारे नागरिकांना दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट यांची आवश्यकता आहे. त्यामुळे या वस्तुंना प्राधान्य देऊन त्यांची वाहतूक केली जात आहे.

सर्वाधिक मास्क, सॅनिटायझर आणि औषधांची वाहतूक उत्तर रेल्वे प्रशासनाकडून केली गेली आहे. त्यांच्याद्वारे ३९९.७१ टन औषधांची वाहतूक केली आहे. त्यानंतर पश्चिम रेल्वेने ३२८.८४ टन आणि मध्य रेल्वेने १३५.६४ टन  औषधांची वाहतूक केली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा