Advertisement

इमारतींमध्ये पार्किंगची सोय; ५० लाख वाहनांचे पार्किंग होणार

मुंबईतील छोटे रस्ते व महामार्गांवर वाहनांच्या मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता वाहनांच्या पार्किंगची समस्या उद्भावत आहेत.

इमारतींमध्ये पार्किंगची सोय; ५० लाख वाहनांचे पार्किंग होणार
SHARES

मुंबईतील छोटे रस्ते व महामार्गांवर वाहनांच्या मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता वाहनांच्या पार्किंगची समस्या उद्भावत आहेत. रस्त्याच्या कडेला पार्किंग केल्यानं अनेकदा छोट्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी नागरिकांना निश्चित स्थळी व रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क केल्यानं चालणं कठीण होतं. त्यामुळं आता मुंबईतील गाड्या पार्किगचा प्रश्न सोडणवण्यावर भर दिला जात आहे.

वाहनांच्या पार्किंगची कोंडी फोडण्यासाठी खासगी इमारतींमध्ये पार्किंगची सोय उपलब्ध करुन देण्याचा विचार सुरू आहे. त्यातून खासगी संकुलांनाही उत्पन्न मिळू शकते. येत्या काळात मुंबईत ५० लाख वाहनांच्या पार्किंगची सोय करण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनही तयार करण्यात येणार आहे.

पार्किंग प्राधिकरणामार्फत या सर्व योजना राबवल्या जाणार आहेत. मुंबईतील सगळ्यात मोठ्या पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरण तयार केले जात आहे.

दक्षिण आणि मध्य मुंबईत ३० ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांचा वापर सुरु झाला आहे. यापैकी १२ वाहनतळांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा आणि उमाडा या कंपन्याशी करार करण्यात आला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा