Advertisement

कसा साजरा कराल महिला दिन ?


कसा साजरा कराल महिला दिन ?
SHARES

मुंबई - महिला दिन हा जगभरातल्या सर्वच महिलांसाठी खास दिवस असतो. त्यामुळे हा दिवस आणखी खास होईल यासाठी आम्ही तुम्हाला काही खास जागा सांगणार आहोत. तिथे तुम्ही तुमच्या परिवारासोबत गेलात तर तुम्हाला भरपूर एन्जॉय करता येईल यात शंका नाही.

महिलांसाठी एलिफंटा यात्रा

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने या खास दिवशी 200 महिलांसाठी एलिफंटा गुहेच्या एका टूर पॅकेजची योजना तयार केली आहे. 100 जणांची क्षमता असलेली एक बोट 8 मार्चला सकाळी 9 ते 12 पर्यंत महिलांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. यात महिलांना दोन राऊंड दिले जातील. सर्व बोट ऑपरेटर्सना एक परिपत्रक जारी करुन त्यात महिलांसाठी खास 3 जागा आरक्षित ठेवायला सांगण्यात आलं आहे. एलिफंटा गुहेला 2000 वर्षापासूनचा इतिहास आहे. मूर्ती आणि रहस्यपूर्ण गुहेचं हे शांत ठिकाण गेटवे ऑफ इंडिया पासून 45 मिनिटांवर आहे.

ऐतिहासिक वास्तूंना देऊ शकता भेट

एलिफंटा गुहेतून फिरून आल्यानंतर तुम्ही काळा घोडा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाची सैर करु शकता. तसंच संध्याकाळी 6 वाजता कवी रुमीचे सूफीवाद यांचा ऐतिहासिक वारसा तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे मुंबईतील मुख्य संग्रहालय आहे. याची निर्मिती ज्या वेळी वेल्सचे राजकुमार भारत दौरा करायला आले होते, तेव्हा त्यांनी प्रतिष्ठित उद्योगपती आणि नागरिकांकडून मिळालेल्या निधीतून केली होती. ही वास्तू दक्षिण मुंबईच्या फोर्टमधील एल्फिन्स्टन कॉलेजच्या समोर आहे. त्याच्यासमोरच रिगल सिनेमागृहही आहे. तसंच याच परिसरात डेविड ससून पुस्तक संग्रहालय आहे.

चर्चा आणि प्रवचन

जर, तुम्ही शॉर्ट फिल्म, चर्चा, वाचन, संगीत, पुस्तक याचे चाहते असाल तर महालक्ष्मीच्या शक्ती मिल कंपाऊंडमध्ये जी5ए फाऊंडेशन, समकालीन संस्कृती आणि अक्षरा केंद्राच्या वतीने महिला दिनानिमित्त 'On Consent' शोचं आयोजन केलं गेलं आहे. जो संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. ज्यात तुम्हीसुद्धा सहभाग घेऊ शकता. आपल्या आवडीची चर्चा-प्रवचनं करु शकता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा