Advertisement

कोकणातील 'या' तीन रेल्वे गाड्या ठाणे, दादरपर्यंतच धावणार

कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेसला फटका बसला आहे. या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील.

कोकणातील 'या' तीन रेल्वे गाड्या ठाणे, दादरपर्यंतच धावणार
SHARES

मध्य रेल्वेवरील (central railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक 12 आणि 13 ची पायाभूत कामे केली जात आहेत.

त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेसला फटका बसला आहे. या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे (thane) आणि दादरपर्यंतच (dadar) धावणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी, तेजससह मंगळुरू एक्स्प्रेस या कोकणवासीयांसाठी महत्त्वाच्या रेल्वेगाड्या आहेत. परंतु, मागील काही कालावधीपासून सीएसएमटी येथे फलाट विस्तारीकरणाचे काम केले जात आहे.

मंगळुरू एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत तर जनशताब्दी आणि तेजस गाड्या दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत. तसेच आता 31 जानेवारीपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे.

गाडी क्रमांक 12134 मंगळुरु ते मुंबई- सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. गाडी क्रमांक 22120 मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 12052 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे (konkan railway) देण्यात आली.



हेही वाचा

मंत्रालयात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध

मुंबईत चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा