Advertisement

हार्बरवरील एसी लोकलचं तिकीट 'इतक्या' रुपयांचं

ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही आता गारेगार रेल्वे प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. या एसी रेल्वेचं तिकीट पुढीलप्रमाणे असणार आहे.

हार्बरवरील एसी लोकलचं तिकीट 'इतक्या' रुपयांचं
SHARES

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (union minister of state for railways suresh angadi) यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेच्या (central railway) पहिल्या वातानुकूलित लोकलला (ac local) गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) इथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानुसार ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही आता गारेगार रेल्वे प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील या पहिल्या एसी लोकलचं (ac local) सारथ्य महिला मोटरमनच्या (women motarman) हाती सोपवण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातून ५ दिवस ही एसी लोकल ट्रान्स हार्बर (trans harbour) मार्गावर धावेल. मात्र शनिवार आणि रविवार एसी लोकलची फेरी होणार नाही. या वेळेत साधी लोकल चालण्यात येईल. एसी लोकलच्या दोन्ही दिशेने एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. त्यानुसार पहिली फेरी पहाटे ५.४४ वाजता पनवेल-ठाणे मार्गावर होईल, तर ठाणे-पनवेल मार्गावर रात्री ९.५४ ला शेवटची फेरी असेल. 


एसी लोकलचे तिकीट दर (ठाणे स्थानकापासून)

एका बाजूचा प्रवास, रुपयांमध्ये

स्थानककिमीतिकीट मासिक
ऐरोली

७०
७५५
रबाळे

७०
७५५
घणसोली
११
९५
१०१५
कोपरखैरणे
१३
९५
१०१५
तुर्भे
१६
१४०
१४५५
जुईनगर
१८
१४०
१५००
नेरुळ
२१
१४०
१५१०
सीवूड
२२
१४०
१५१०
बेलापूर
२४
१४०
१५१०
खारघर
२७
१८५
१९४०
मानसरोवर
३०
१८५
१९७५
खांडेश्वर
३२
१८५
१९८५
पनवेल
३५
१८५
१९८५


एसी लोकल सुटण्याची वेळ (सोम-शुक्र)  

पनवेल-ठाणे
सकाळी ५.४४
ठाणे-नेरुळ
सकाळी ६.४६
नेरुळ-ठाणे
सकाळी ७.२९
ठाणे-वाशी
सकाळी ०८.०८
वाशी-ठाणे
सकाळी ८.४५
ठाणे-नेरुळ
सकाळी ९.१९
नेरुळ-ठाणे
सकाळी ९.५७
ठाणे-बेलापूर
सकाळी १०.४०
पनवेल-ठाणे
दुपारी ४.१४
ठाणे- नेरुळ
सायंकाळी ५.१६
नेरुळ-ठाणे
सायंकाळी ५.५४
ठाणे-नेरुळ
सायंकाळी ६.२९
नेरुळ-ठाणे
सायंकाळी ७.०८
ठाणे-पनवेल
सायंकाळी ७.४९
पनवेल-ठाणे
रात्री ८.५२
ठाणे-पनवेल
रात्री ९.५४


या लोकलमध्ये आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी टॉकबॅक (talk back system) यंत्रणा आहे. मध्य रेल्वेच्या (central railway) वातानुकूलित लोकलला ac local प्रवाशांचा प्रतिसाद लाभावा, यासाठी मध्य रेल्वेने नवी मुंबईतील व्यापारी संकुलांतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या लोकलच्या प्रवासाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे.

मध्य रेल्वे मार्गावरसुद्धा (central railway) एसी लोकल (ac local) चालवण्यात यावी, अशी रेल्वे विभागासोबत प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. परंतु एसी लोकलची उंची आणि इतर तांत्रिक कारणांमुळे मध्ये रेल्वे मार्गावर एसी लोकल चालवता येत नव्हती. परंतु एसी लोकलची उंची कमी करून आणि इतर तांत्रिक दुरूस्ती करुन ही लाेकल या मार्गावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या लोकलचं तिकीट किती (ticket rate) असेल, याची सर्वच प्रवाशांना उत्सुकता आहे. त्यानुसार या लोकलचे तिकीट दर पुढील प्रमाणे असतील. ठाणे ते पनवेल ३५ किमी अंतराच्या प्रवासासाठी प्रवाशांना सध्याच्या दीडपट म्हणजेच मासिक पाससाठी (monthly pass) १९८५ रुपये खर्च करावे लागतील. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा