Advertisement

भिवंडी, दिवा आणि मुंब्रासाठी बस सेवा सुरू

भिवंडी, दिवा आणि मुंब्रासाठी ५ मार्च २०२१ पासून ही सेवा प्रभावीपणे सुरू झाली आहे. ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली गेली आहे.

भिवंडी, दिवा आणि मुंब्रासाठी बस सेवा सुरू
(File Image)
SHARES

ठाणे महानगरपालिका परिवहन (TMT)नं भिवंडीच्या औद्योगिक केंद्राला दिवा आणि मुंब्राच्या दाट लोकवस्ती असलेल्या उपनगराशी जोडणारी सेवा सुरू केली आहे. ५ मार्च २०२१ पासून ही सेवा प्रभावीपणे सुरू झाली आहे. सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली गेली आहे.

८४ क्रमांकाचा नवीन मार्ग आता भिवंडीतील मुंब्रा पोलिस स्टेशन आणि शिवाजी चौक असा असेल. एकूण २० फेऱ्या या बसच्या दिवसभरात होतील. मुंब्रा इथून पहिली बस सकाळी ७ वाजता सुटेल तर भिवंडीहून सकाळी ८.२० वाजता सुटेल. मुंब्रा इथून शेवटची बस रात्री ८ वाजता सुटेल तर भिवंडीहून रात्री ९.२० वाजता सुटेल.

अहवालानुसार, प्रत्येक ट्रिप पूर्ण होण्यास सुमारे एक तासाचा कालावधी लागेल. शिवाय दिवा आणि मुंब्रा उपनगरातील रहिवाशांना याचा मोठा फायदा होईल.

भिवंडीला थेट कनेक्शन मिळावं यासाठी दोन्ही शहरांतील रहिवाशांची दीर्घकाळ मागणी होती. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्या भिवंडी इथं नोकरी करणाऱ्या रहिवाशांना कामावर जाण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी अडचण येत होती. पण ही सेवा सुरू झाल्यानं त्यांचा प्रवास सोईस्कर होईल.हेही वाचा

बेस्टला ४०५ कोटींचे अनुदान देण्यास पालिका सभागृहात मंजुरी

पोर्टेबल व्हीएमएस यंत्रांमुळे वाहनचालकांना मार्ग बदल सूचना मिळणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा