Advertisement

एसटीची भाडेवाढ होणार?


एसटीची भाडेवाढ होणार?
SHARES

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाली असली तरी, अद्याप वेळेच्या बंधनामुळं सामान्यांना अद्याप एसटी आणि खासगी गाडीनंच प्रवास करावा लागत आहे. वाढत्या इंधनदरामुळं सामान्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच आता एसटी भाडेवाढीचा मारही प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय होणार आहे.

फेब्रुवारी २०२०मध्ये डिझेल ६६ रुपये प्रति लिटर होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये हाच दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचला. सध्या एसटी महामंडळाला रोज ९ लाख लिटर डिझेल लागत असून, डिझेल दरात १३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळं एसटी महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनेत रोज १ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

एसटीचा संचित तोटा ५ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. लॉकडाउन काळात महामंडळाचे झालेले आर्थिक नुकसान, डिझेलची देणी यांचा एकत्रित विचार केल्यास महामंडळाचा तोटा आणखी १ हजार कोटींनी वाढण्याचा अंदाज आहे. उत्पन्नवाढीसाठी आगामी काही काळ भाडेवाढ करावी लागेल. मात्र, ती नेमकी किती असेल याबाबत संचालक मंडळातील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसटीत 'बदलणारे (फ्लेक्सी) तिकीटदर'ही लागू करण्यापूर्वी कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहेत.

महामंडळातील सुमारे तीन हजारहून अधिक गाड्यांचे आयुष्य पूर्ण झाले आहे. महामंडळासाठी दोन हजार नवीन गाड्या घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा