Advertisement

फिरायला बाहेर निघालेले मुंबईकर वाहतूककोंडीने 'जाम'

सलग तीन सुट्ट्या जोडून आल्याने ख्रिसमससोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला निघालेले मुंबईकर इस्टर्न एक्स्प्रेसवरील वाहतूककोंडीत अडकले आहेत.

फिरायला बाहेर निघालेले मुंबईकर वाहतूककोंडीने 'जाम'
SHARES

मुंबई-पुणे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सलग तीन सुट्ट्या जोडून आल्याने ख्रिसमससोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला निघालेले मुंबईकर इस्टर्न एक्स्प्रेसवरील वाहतूककोंडीत अडकले आहेत.


सुट्ट्यांचा प्लान

शनिवार, रविवार आणि त्याला जोडून ख्रिसमस अशा तीन सुट्ट्या लागून आल्याने बहुतांश मुंबईकरांनी आऊटींगचा प्लान बनवलेला आहे. त्यानुसार पुणे, नाशिक, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि गोवा इ. नियोजित ठिकाण गाठण्यासाठी मुंबईकर शुक्रवारी रात्रीच घराबाहेर निघाले. मात्र एकाच वेळेत शेकडो गाड्या रस्त्यावर उतरल्याने मुंबई-पुणे इस्टर्न मार्गावर वाहतूककोंडी व्हायला लागली.


खड्ड्यांची भर

ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे पुढचे ४ दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे. शिवाय, वाहतूक विभागानं ऐरोलीमार्गे इस्टर्न एक्स्प्रेसवरून ठाण्याकडे वाहतूक वळवल्यानं इस्टर्न एक्स्प्रेसवर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. याचा फटका सीएसटीहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना देखील बसत आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यंत तसंच ऐरोलीपर्यंत जागोजागी जाम झाला आहे.


रेल्वेवरही मेगाब्लाॅक

याच काळात हार्बर मार्गावर ३ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरु होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून ७२ तसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळेही रस्ते वाहतुकीवर ताण पडला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा