Advertisement

कारवाईपासून वाचण्यासाठी कार चालकानं वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं

एका वाहतूक पोलिसाला कार चालकानं कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं. मुंबईतील अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली.

कारवाईपासून वाचण्यासाठी कार चालकानं वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं
SHARES

वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असं वाहतुक पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येतं. मात्र अनेकदा चालक गाडी वेगानं चालवत असल्यानं वाहतुकीच्या नियमांकडं दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. शिवाय, या कावाईदरम्यान अनेक पोलिसांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. दरम्यान, अशीच एक घटना मुंबईतील अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. एका वाहतूक पोलिसाला कार चालकानं कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं. विजय गुरव असं या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे ड्युटी करत होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 या क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार नो एंट्रीत आली.

नो एंट्रीत घुसणाऱ्या कारला हा पोलीस थांबवत होता. मात्र गाडी न थांबविल्यानं वाहतूक पोलिसानं बोनेटवर उडी मारली. तरी देखील चालकानं कार न थांबवता पोलिसाला पुढे फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढे काही स्थानिक लोकांनी ही गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसाला बोनेटवरून खाली उतरवलं. या प्रकारानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला. हा प्रकार ३० सप्टेंबर  सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला घडला. कार नो एंट्रीत आल्याचं पाहून वाहतूक पोलीस दुरव यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार चालकानं कार थांबवली नाही.

गुरव यांनी कारच्या आडवे येत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. आपण कारच्या पुढे आहोत हे पाहिल्यावर कार चालक कार थांबवेल असे गुरव यांना वाटले.मात्र कार चालकाने कार न थांबवता तशीच पुढे नेली. शेवटी कारच्या धक्क्याने गुरव कारच्या बोनेटवर सरकले. त्यानंतर चालकाने गुरव यांना फरफटत काही अंतर पुढे नेले. या प्रकरणी आता अंधेरीतील डी एन नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा