रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

 CST
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई - रुळ दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाईल.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते बोरीवलीच्या जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर काही अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बरच्या रेल्वे मार्गावरील सीएसटी ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.35 ते 3.37 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दरम्यान बेलापूर, वाशीमार्ग धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या मुलंड ते कल्याण दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.23 वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तर मुलुंड ते कल्याण स्थानकादम्यान धिम्या मार्गावरी गाड्या जलद मार्गावरून धावतील. या गाड्या ठाणे, दिवा, डोबिवली स्थानकावर थांबणार असून 10 मिनिटं उशिराने पोहचतील.

Loading Comments