मध्य रेल्वेतर्फे कर्जत यार्ड रिमॉडेलिंग आणि कर्जत स्थानकात ८ क्रमांकाचे पोर्टल उभारण्याच्या कामासाठी रविवारी (ता. ११) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय मार्गावरील लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
रविवारी सकाळी १०.४५ ते दुपारी १२ या कालावधीत नागनाथ ते कर्जतपर्यंत अप मार्गावर आणि ठाकूरवाडी ते कर्जत डाऊन आणि मिडल मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत कर्जत ते खोपोलीदरम्यान कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही.
तसेच ट्रेन क्र. २२७३१ हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. ११०१४ कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस लोणावळा येथे नियमित केल्या जातील आणि गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा उशिराने पोहचणार आहे.
हेही वाचा