पश्चिम रेल्वे ताफ्यातील १२० लोकलला जोडणार ३ डबे

प्रवाशांची होणारी ही गैर सोय लक्षात घेत पश्चिम रेल्वे प्रशासनानं १२ डब्बा लोकलला आणखी ३ डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

मुंबईसह उपनगरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्य संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. त्यामुळं रेल्वे स्थानकांवर गर्दी होत असून लोकलमध्येही चढताना प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं प्रवाशांची होणारी ही गैर सोय लक्षात घेत पश्चिम रेल्वे प्रशासनानं १२ डब्बा लोकलला आणखी ३ डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. १२ डब्याच्या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

५४ फेऱ्या

सध्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्याच्या ५ लोकल असून, त्या चर्चगेट ते विरार जलद मार्गावर धावत आहेत. तसंच, या लोकलच्या दिवसभरात ५४ फेऱ्या होतात. मात्र, आता प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ताफ्यातील १२० लोकल गाड्यांना आणखी ३ डबे जोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.

१२० लोकल गाड्या

ताफ्यातली १२० लोकल गाड्यांना ३ डबे जोडण्याचं काम २०२० वर्षाअखेरी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ३ डबे जोडल्यानंतर म्हणजे १५ डबा लोकल सुरुवातील विरार ते अंधेरी या मार्गावर चालविण्यात येणार असून, ४ मिनिटांनी एक लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांच्या संख्येत प्रतिदिन १.२ लाखांनी वाढ होण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

नफेखोरी कमावण्यासाठी चुकीचं नियोजन, बीडीडी पुनर्विकासाविरोधात हायकोर्टात याचिका

'या' रेल्वे स्थानकांत एटीव्हीएमसाठी विशेष स्वतंत्र कक्षसंबंधित विषय
ताज्या बातम्या