Advertisement

बेस्टचा ट्रायमॅक्स कंपनीला रामराम


बेस्टचा ट्रायमॅक्स कंपनीला रामराम
SHARES

आधीच तोट्यात चालणाऱ्या, डोक्यावर कोट्यवधींचं कर्ज असणाऱ्या बेस्टला बेस्टमधील तिकीट वितरण प्रणाली राबवणाऱ्या ट्रायमॅक्सनं आणखी खड्ड्यात घातलं आहे. बेस्टच्या, प्रवाशांच्या सोयीसाठी आणण्यात आलेल्या ट्रायमॅक्सनं बेस्टचं गेल्या आठ वर्षात काही कोटी नव्हे तर तब्बल १२२ कोटी रुपयांचं नुकसान केलं आहे. तर सध्या ट्रायमॅक्सच्या ६ हजार मशिन बंद असल्यानं बेस्टमध्ये पुन्हा टिकटिक सुरू झाली आहे.

बेस्टचं कोट्यवधींचं नुकसान करणाऱ्या या ट्रायमॅक्सला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा डाव बेस्ट प्रशासनानं आखला होता. बेस्ट समितीनं मात्र हा डाव हाणून पाडतं अखेर बेस्टसाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रायमॅक्सला रामराम ठोकला आहे. शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्टला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी जोरदार विरोध करत हा प्रस्ताव हाणून पाडल्याची माहिती बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली आहे.


ट्रायमॅक्स मशिन डोकेदुखी

बेस्टमधील टिकटिक अर्थात कागदी तिकीट बंद करत २०१० मध्ये बेस्टनं मशीनद्वारे तिकीट वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रायमॅक्स कंपनीला यासाठीचं कंत्राट दिलं. बेस्ट बसमध्ये ९ हजार मशीनच्या माध्यमातून तिकिट वितरीत करू जाऊ लागली. सुरूवातीला ही यंत्रणा सुरू राहिली, पण नंतर हळूहळू या यंत्रणेतील दोष समोर येऊ लागले. मशीन मध्येच बंद पडू लागली, अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळं ट्रायमॅक्स मशिन वाहक आणि एकूणच बेस्टसाठी डोकेदुखी ठरू लागल्या.


बेस्टला १२२ कोटींचा फटका

ट्रायमॅक्सच कंत्राट २०१६ मध्ये संपलं. असं असताना डोकेदुखी ठरलेल्या ट्रायमॅक्सला बेस्ट प्रशासनानं दोनदा मुदतवाढ दिली. आजच्या घडीला ९ हजारपैकी ६ हजार मशिन बंद असून या ट्रायमॅक्सनं बेस्टचं १२२ कोटींचं नुकसान केलं आहे. त्यामुळं ट्रायमॅक्सला हद्दपार करावं अशी मागणी जोर धरत असतानाच प्रशासनानं मात्र ट्रायमॅक्सला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आणला. 

हा प्रस्ताव शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात आला नि मग यावरून चांगलाच गदारोळ झाला. सर्वच सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करत हा प्रस्ताव अखेर नामंजुर करून घेतला. त्यामुळं आता ट्रायमॅक्स आऊट झाली असून मशीन तिकीट प्रणाली राबवण्यासाठी नव्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येईल, असंही गणाचार्य यांनी सांगितलं आहे



हेही वाचा - 

रेल्वे अपघातग्रस्त तेजश्रीला हवाय मदतीचा हात!

पावसाचा शताब्दी एक्सप्रेसला फटका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा