भल्या पहाटे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक

  Ville Parle
  भल्या पहाटे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक
  मुंबई  -  

  विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाळूने भरलेला ट्रक बुधवारी पहाटे उलटला. यामुळे भल्या पहाटे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नेमका हा अपघात का झाला याचे कारण अद्याप जरी कळू शकलेलं नसलं तरी यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.

  भल्या पहाटे ट्रक उलटल्यामुळे सांताक्रुज आणि मिलन सबवे दरम्यान मुंबईकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे मुंबईकरांची सकाळची सुरुवात ही वाहतूक कोंडीनेच झाली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.