एसी लोकलसाठी उभारणार २ नवे रेल्वे कारशेड, रेल्वे अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

मुंबई रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या एसी लोकलसाठी २ नवीन कारशेड उभारण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. नवीन कारशेड अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत.

SHARE

पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, आगामी काळात आणखी काही एसी लोकल दाखल होणार आहेत. परंतु, या एसी लोकलकरीता कारशेड नसल्यामुळं देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता एसी लोकलच्या देखभाल-दुरुस्तीची चिंता मिटली आहे. कारण मुंबई रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या एसी लोकलसाठी २ नवीन कारशेड उभारण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. नवीन कारशेड अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत. सध्या मुंबई रेल्वेच्या ताफ्यातील एसी लोकलची देखभाल-दुरुस्ती महालक्ष्मी कारशेडमध्ये करण्यात येत आहे.


३ जागांची चाचपणी

मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला, कळवा आणि सानपाडा तसंच, पश्चिम रेल्वे मार्गावर महालक्ष्मी आणि विरार येथे कारशेड आहेत. या कारशेडमध्ये लोकल उभ्या करण्याची क्षमता पुर्ण झाली आहे. त्यामुळं नवीन कारशेडसाठी महापे, वाणगाव आणि कर्जत ३ जागांची चाचपणी करण्यात आली. परंतु, महापे येथील जागेवर लोकल उभी करण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळं महापे या जागेचा पर्याय रद्द करण्यात असून, नवीन कारशेडसाठी बोईसरजवळील वाणगाव आणि पनवेल-कर्जतदरम्यान कर्जत ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसंच या कारशेडचं मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे.


जागा कारशेडसाठी योग्य

पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नवीन कारशेडच्या जागेचं सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार या दोन्ही जागा कारशेडसाठी योग्य असून, या पाहणी अहवालाला रेल्वे मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कारशेडसाठी भूसंपादनाला सुरुवात होणार आहे.हेही वाचा -

दहावीचा निकाल जाहीर, मुंबईचा निकाल ७७.०४ टक्केसंबंधित विषय
ताज्या बातम्या