Advertisement

दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर शनिवार ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे.

दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर शनिवार ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी घसरला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीनं पाहता येईल. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊट देखील काढता येईल.

मुंबईचा निकाल ७७.०४ टक्के

निकालांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने (८८.३८ ) बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ६७.२७ टक्के लागला आहे. मुंबईचा निकाल ७७.०४ टक्के इतका लागला आहे.

मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं नवीन अभ्यासक्रमानुसार १ मार्च ते २२ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींना ८२.८२ टक्के तर मुलांना ७२.१८ टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल १२.३१ टक्क्यांनी घटला असून मागील ५ वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थीनींचा समावेश होता.


'या' वेबसाईटवर पाहा निकाल

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in


विभागानुसार निकाल

  • पुणे - ८२.४८ 
  • नागपूर - ६७.२७ 
  • कोकण - ८८.३८ 
  • औरंगाबाद - ७५.२० 
  • मुंबई - ७७.०४ 
  • कोल्हापूर - ८६.५८ 
  • अमरावती - ७१.९८ 
  • नाशिक - ७७.५८ 
  • लातूर - ७२.८७ 



हेही वाचा -

मंत्रालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका, लंच ब्रेक आता अर्ध्या तासाचा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा