Advertisement

लोकल फेऱ्या कमी करण्याचे संकेत, पुन्हा लॉकडाऊनची शक्यता


लोकल फेऱ्या कमी करण्याचे संकेत, पुन्हा लॉकडाऊनची शक्यता
SHARES

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.

रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरु आहेत. तसेच पुन्हा लॉकडाऊन केल्यास जनतेला परवडणारं नाही. अनेक लोकांना नाहक त्रास होईल परंतु वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. असे वक्तव्य करत महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊ होण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला आहे. त्यामुळे सरकार विचारपूर्वक निर्णय घेत आहे. कोरोनामुळेच अधिवेशनाचे कामकाजही ८ दिवसांचे केले असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटलं.

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु आहे. लोकलमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होते तसेच नियमांचे उल्लंघन होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटलं.

विदर्भात कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विदर्भातील ४ जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर, लग्न समारंभांवर ही लक्ष ठेवण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सिनेमागृहे बंद करण्याचा विचारही सुरु असल्याचे मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा