Advertisement

नवा वाशी खाडी पूल १ फेब्रुवारीपासून बंद, वाहनचालकांना तूर्तास दिलासा


नवा वाशी खाडी पूल १ फेब्रुवारीपासून बंद, वाहनचालकांना तूर्तास दिलासा
SHARES

सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं आहे. या कामासाठी नव्या वाशी खाडी पुलावरील एक मार्ग मंगळवार, २३ जानेवारीपासून बंद ठेवण्यात येणार होता. पण आता हे काम पुढे ढकलण्यात आलं आहे.

या कामाला आता १ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या वाशी खाडी पुलावरील एक मार्ग १ फेब्रुवारीपासून बंद राहणार आहे.


कारण काय?

नव्या वाशी खाडी पुलावरील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळं पुलावरील ज्वाईंटची झिज झाली आहे. या ज्वाईंटची त्वरीत दुरूस्ती होणं गरजेचं असल्यानं हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं आहे. २० दिवस हे काम चालणार असून त्यासाठी मुंबईवरून नवी मुंबई-पुण्याच्या दिशेनं जाणारा एक मार्ग बंद करण्यात येणार आहे. तर पुणे-नवी मुंबईकडून मुंबईकडे येणारा मार्ग खुला राहणार आहे.

त्यामुळे पुण्याकडे जाण्यासाठी मुंबईकरांना जुन्या खाडी पुलाचा वापर करावा लागणार असून जड वाहनांसाठी एरोली पूल वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून पुढचे २० दिवस जड वाहनं एरोली पुलावरून नवी मुंबई-पुण्याच्या दिशेने जातील, तर हलकी वाहन जुन्या खाडीपुलावरून जातील, असं नव्यानं वाहतूक विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

मुंबईकरांनो, नवी मुंबईला जाण्यासाठी जुना खाडीपूल वापरा, नव्या पुलाचा एक मार्ग २० दिवस बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा