Advertisement

विस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद


विस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
SHARES

गोवा मार्गावरील निसर्गाची अचंबित रुपे याची देही, याची डोळा पाहायला मिळावीत यासाठी चकचकीत आणि पारदर्शी छत असलेली अत्याधुनिक विस्टाडोम कोचची बोगी दादर-मडगाव एक्स्प्रेसला १८ सप्टेंबरला जोडण्यात आली. त्यानंतर या विस्टाडोम कोचला आतापर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


आतापर्यंत इतका नफा

18 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2017 पर्यंत या विस्टाडोम कोचमधून मध्य रेल्वे प्रशासनाला 33 लाख 84 हजार 226 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाय 31 ऑक्टोबरपर्यंत 19 लाख 97 हजार 239 एवढे उत्पन्न मिळाले आहे. फक्त 2 ते 14 नोव्हेंबरपर्यंत 13 लाख 92 हजार 987 रुपयांचा नफा रेल्वे प्रशानाला झाला आहे.

कोकणवासीय आणि परदेशी पाहुण्यांसाठी रेल्वेचा प्रवास अजून चांगला आणि आनंददायी व्हावा या हेतूने हा कोच सुरू करण्यात आला आहे. शिवाय, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने नव्या विस्टाडोम कोच दादर - मडगाव ट्रेनला जोडला. दरम्यान, या विस्टाडोम कोचचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


अशी आहे विस्टाडोम बोगी

विस्टाडोम बोगीत ४൦ आसनांची व्यवस्था, पुशबॅक आणि रोटेड (१८० अंश कोनात फिरणारे) स्वरुपातील आहे. या आसन व्यवस्थेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना या कोचचे विशेष आकर्षण आहे. बोगीचे दरवाजे स्वयंचलित आहेत. बोगीत जीपीएस यंत्रणा, १२ एलसीडी लाइट, एक लहान आकाराचा फ्रीज, ओव्हन, ज्यूसर ग्राइंडर अशा सुविधादेखील आहेत. आधुनिक बनावटीचे स्वच्छ स्वच्छतागृह हे देखील विस्टाडोमचे वैशिष्ट्य आहे.

संबंधित विषय