Advertisement

लोकलमध्ये भजन करताय? तर सावधान!


लोकलमध्ये भजन करताय? तर सावधान!
SHARES

वडाळा - हार्बर रेल्वे मार्गावरून कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातील चार भजनी मंडळ प्रवाशांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी वडाळा स्थानकात अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. केवळ भजनी मंडळीच नव्हे तर अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे प्रवाशांना त्रास होणार असेल तर अशा सर्व प्रकारांवर कारवाई करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी मोहीम हाती घेतल्याची माहिती वडाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी दिली.

गर्दीच्या वेळी या भजनी मंडळांमुळे काहींना आवाजाचा तर काहींना ही भजनी मंडळी जागा अडवून ठेवतात याचा त्रास होतो. यासंदर्भात प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार वडाळा लोहमार्ग पोलिसांनी भजनी मंडळातील चार जणांना अटक करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112, 117 नुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकाश गणपत भूड (43), महेंद्र हनुमान मोटे (38), दीपक ज्ञानदेव काळे (28), दीपक शंकर अरुवळे (30) अशी या भजनी मंडळातील सदस्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी रू. 200 दंडाची शिक्षा सुनावली असून जामिनावर सोडले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा