भायखळ्यात घाणीचं साम्राज्य

 Mazagaon
भायखळ्यात घाणीचं साम्राज्य
भायखळ्यात घाणीचं साम्राज्य
भायखळ्यात घाणीचं साम्राज्य
See all

भायखळा - गेल्या अनेक महिन्यांपासून भायखळा येथील स्टेशन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या गाड्या दिवसातून तीन वेळा इथे कचरा उचलण्यास येतात. मात्र तरी देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचतो. या समस्येमुळे इथले रहिवासी त्रस्त झाले आहेत. इथले स्थानिक रहिवासी आझाद शेख यांनी भायखळ्याचे आमदार वारिस पठाण आणि स्थानिक नगरसेविका यांना पत्र लिहून आपली समस्या मांडली. परंतु अद्याप यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. याबाबत जेव्हा नगरसेविका वंदना गवळी यांना विचारले असता लवकरच यावर काहीतरी तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं.

Loading Comments