Advertisement

गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, जाणून घ्या टाईमटेबल

यंदा श्रावण अधिक मास आल्यामुळे गणपतीचं आगमन उशिरा असले तरी चाकरमान्यांना कोकणात गौरी, गणपतीसाठी जाण्याचे वेध लागले आहेत.

गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, जाणून घ्या टाईमटेबल
SHARES

गौरी गणपतीसाठी असंख्य मुंबईकर कोकणात जातात. अशावेळी चाकरमान्यांनी गावी पोहोचावे म्हणून एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हाला अजून कन्फर्म तिकीट मिळालं नसेल तर आता चिंता नाही. मध्ये रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. 

पश्चिम रेल्वेने 30 गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 14 ते 30 सप्टेंबर या काळात मुंबई सेंट्रल सावंतवाडीदरम्यान धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून 208 गणपती विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. मात्र त्यांचं बुकिंग फुल्ल झाल्यामुळे नाराजी होती.  (konkan railway ganpati booking 2023 special trains time table railway and Ganpati Special ST Bus )

दरम्यान मुंबई विभागाने गौरी गणपतीकरिता (Ganpati Special Bus) कोकणात जाण्यासाठी जादा एसटी बसचे सोडण्यात येणार आहे. 1,121 बस गणपती काळात सोडण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने 60 दिवसांपूर्वीच गणेशभक्तांना ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. मुबई आगारातून 385, परळ 411, कुर्ला नेहरुनगर 301, पनवेल 17, उरण 7 अशा एकूण 1,121 जादा बस सोडण्यात येणार आहे. 

1) गाडी क्र. -09009 / 09010 मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल वरुन (आठवड्यातील 6 दिवस) म्हणजे  14 सप्टेंबरपासून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारला रात्री 12.00 सुटणार आहेत. तर या गाड्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता सावंतवाडीला पोहोचतील. 

गाडी क्रमांक 09010  सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल या दरम्यान आठवड्यातील 6 दिवस या विशेष गाड्या सावंतवाडी रोडवरून 15 सप्टेंबरपासून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारारी संध्याकाळी 5 वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी 20:10 वाजता मुंबई सेंट्रलला दाखल होतील. 

2) गाडी क्रमांक 09018/ 09017- उधना - मडगाव जं.ही साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार 15,22,29 सप्टेंबरला दुपारी 15:25 ला सुटणार आहे. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. 

गाडी क्र. 09017 मडगाव जं. - उधना (साप्ताहिक) विशेष गाडी मडगाव जंक्शनहून शनिवार 16, 23 आणि 30 सप्टेंबरला सकाळी 10:20 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी उधनाला पहाटे ५ वाजता पोहोचेल.

या गाड्यांचे तपशील माहिती जाणून घ्यासाठी  www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड नक्की करा. 



हेही वाचा

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचा ठाणे, विरार आणि बोईसरकरांना होणार फायदा

गुड न्यूज! सर्वसामान्यांसाठी रेल्वेची 'जनथाळी', फक्त २० रुपयांत जेवण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा