Advertisement

पश्चिम माटुंग्याच्या पादचारी पुलाला तडे गेल्याने बंद


पश्चिम माटुंग्याच्या पादचारी पुलाला तडे गेल्याने बंद
SHARES

अंधेरीतील पुलाच्या दुघर्टनेनंतर आता पश्चिम माटुंगा रेल्वेच्या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या पादचारी पुलालाही तडे गेल्याची बाब समोर आली आहे. या पुलाचा मध्य भाग खालच्या दिशेला झुकून त्याला तडे गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने हे पादचारी पूल बंद केलं आहे. मात्र, या पादचारी पुलाबरोबरच सेनापती बापट मार्गावर उतरणारा जिनाही सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.


पूल पादचाऱ्यांसाठी बंद

माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकातून पश्चिम दिशेला जाण्यासाठी पादचारी पूल असून ते संतविश्वेश्वरय्या उड्डाणपुलाला जोडले जाते. या पादचारी पुलाच्या प्रारंभीच एका खांबाचं सिमेंट निखळलं होतं. परंतु, त्यानंतर हे पूल खालच्या दिशेला झुकल्याचं नागरिकांनी सांगितल्यानंतर त्याची पाहणी केली असता त्याला तडे गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते पादचाऱ्यांसाठी त्वरीत बंद केलं आहे.

हे पूल बंद करण्यात आल्यामुळे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांची पुलाखालील टी.एच.कटारिया मार्गावर गर्दी वाढू लागली आहे. या पुलाअभावी पादचाऱ्यांची गैरसोयही होऊ लागली आहे.


पूल विभाग अधिकारी करणार पाहणी

यासंदर्भात महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे पूल सुरक्षेच्यादृष्टीने बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केलं. या पुलाची पाहणी महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यानंतर या पुलाचं बांधकाम सुरक्षित असल्याचं आढळून आल्यास ते पूल पादचाऱ्यांसाठी खुलं करून दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

मुंबईतील 'हे' धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा