Advertisement

पश्चिम रेल्वेकडून 'या' ट्रेन्सच्या वेळेत बदल जाहीर

मार्गावरील स्थानकांसाठी काही गाड्यांच्या वेळा बदलल्या जातील.

पश्चिम रेल्वेकडून 'या' ट्रेन्सच्या वेळेत बदल जाहीर
SHARES

पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम दरम्यान धावणाऱ्या आणि वांद्रे टर्मिनस-बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेससह अनेक गाड्यांच्या वेळत बदल केले आहेत.

गाडी क्रमांक २२४७४ वांद्रे टर्मिनस-बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेस २८ मार्चपासून वांद्रे टर्मिनसवरून दुपारी २.४० वाजता १० मिनिटे लवकर सुटेल. गाडी क्रमांक २२९५१ वांद्रे टर्मिनस गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेस वांद्रे टर्मिनसवरून १० मिनिटे लवकर सुटेल.

गाडी क्रमांक ०९१७१ सूरत-भरूच मेमू २८ मार्चपासून सुरतहून संध्याकाळी ६.३७ वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक १९४०७ अहमदाबाद वाराणसी एक्सप्रेस ३० मार्चपासून अहमदाबादहून रात्री ९.४५ वाजता सुटेल.

पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मार्गावरील स्थानकांसाठी काही गाड्यांच्या वेळा बदलल्या जातील.



हेही वाचा

उन्हाळी सुट्टीत कोकणात जाताय, दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा