Advertisement

अर्धवातानुकूलित लोकलच्या चाचणीला आरडीएसओची मंजुरी

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

अर्धवातानुकूलित लोकलच्या चाचणीला आरडीएसओची मंजुरी
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण प्रवाशांना आता लवकरच अर्धवातानुकुलीत लोकलमधून प्रवासाची संधी मिळणार आहे. ६ डबे वातानुकूलित व ६ डबे साधारण अशा १२ डब्यांच्या उपनगरी रेल्वेच्या चाचणीला रेल्वेच्या रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेननं (आरडीएसओ) मंजुरी दिली आहे. तसंच, या लोकलची चाचणी पुढील आठवड्यापासून करण्याचा विचार केला जात आहे.

चाचणीचा प्रस्ताव

पश्चिम रेल्वेनं १२ डब्यांपैकी ६ डबे वातानुकूलित असलेल्या अर्धवातानुकूलित लोकल चाचणीचा प्रस्ताव केला. तसंच या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. या लोकलच्या चाचण्या पुढील आठवड्यापासून सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मात्र, त्याआधी १२ डब्यांपैकी ३ डबेच वातानुकूलित केल्या जाणाऱ्या दुसऱ्या चाचणीचा प्रस्तावही असून त्याची मंजुरीही घेण्याचा प्रयत्न आहे. त्याला मंजुरी मिळाली तर ६ डबे वातानुकूलित व ६ डबे साधारण असलेल्या १२ डब्यांची लोकलची चाचणी घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्याता आलं आहे.


४ वातानुकूलित लोकल

सध्या पश्चिम रेल्वेवर ४ वातानुकूलित लोकल असून यातील २ लोकल सेवेत आहेत. उर्वरित लोकलपैकी एका वातानुकूलित लोकलचे काही डबे काढून ते सामान्य लोकल गाडीला जोडून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहे. १२ डब्यांमधील जास्त डबे वातानुकूलित जोडले तर त्यालाही कमी प्रतिसाद मिळण्याची भीती रेल्वेला आहे. त्यामुळं कमी डबे वातानुकूलित ठेवून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यावरच अधिक भर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेनं ९ डबे विनावातानुकूलित आणि सहा डबे वातानुकूलित असलेल्या पंधरा डबा अर्धवातानुकूलित लोकलच्या चाचणीचाही प्रस्ताव तयार करून तो आरडीएसओकडं पाठवला आहे.


१२ फेऱ्यांवर गदा

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल दाखल होताच सामान्य लोकलच्या दररोजच्या १२ फेऱ्यांवर गदा आली. त्यामुळं सामान्य लोकलच्या प्रवाशांचा रोष पत्करावा लागला. तसंच, वातानुकूलित लोकलला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून चाचपणीही केली जात होती.



हेही वाचा -

महापालिकेत १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी, इतर ठिकाणी केव्हा मिळणार?

देवनार डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा मिळेना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा