Advertisement

महापालिकेत १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी, इतर ठिकाणी केव्हा मिळणार?

सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील जनतेला केवळ १० रुपयांमध्ये सकस अन्नाची थाळी देणार, असं आश्वासन ​शिवसेनेकडून​​​ विधानसभा निवडणुकीआधी देण्यात आलं होतं.

महापालिकेत १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी, इतर ठिकाणी केव्हा मिळणार?
SHARES

सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील जनतेला केवळ १० रुपयांमध्ये सकस अन्नाची थाळी देणार, असं आश्वासन शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीआधी देण्यात आलं होतं. ही थाळी नेमकी कुठे आणि कशी उपलब्ध होणार?, याबाबत राज्यातील जनतेला उत्सुकता लागून राहिलेली असताना मुंबई महापालिकेच्या कँटीनमध्ये ही थाळी सुरू करण्यात आली आहे. पण ही थाळी इतर ठिकाणी कधी उपलब्ध होणार अशी विचारणा सर्वसामान्यांकडून होऊ लागली आहे. 

हेही वाचा- शिवसेना देणार १० रुपयांत भरपेट जेवण, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून घोषणांची जंत्री

विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या वचननाम्यात शिवसेनेने १० रुपयांत सकस आहार उपलब्ध करून देण्याचं वचन दिलं होतं. या आश्वासनानुसार मुंबई किंवा महाराष्ट्रात नाही, तर चक्क जम्मू-काश्मीरमधील शिवसेनेच्या वतीने १० रुपयांत ‘साहेब खाना’ योजना २ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. या योजनेत सर्वसामान्यांना १० रुपयांत प्रत्यकेला राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी असे पदार्थ देण्यात येत होते. तर मुंबईतील डबेवाल्यांनीही १० रुपयांत थाळीची याेजना सुरू केली आहे.

त्यामुळे शिवसेनेकडून ही योजना मुंबई, महाराष्ट्रात कधी सुरू होईल, अशी विचारणा होत असताना मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कँटीनमध्ये १० रुपयांत थाळीची योजना सुरू करण्यात आली. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापालिकेच्या कँटीनमध्ये गुरूवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. १० रुपयांत मिळणारी ही थाळी सर्वांसाठी असेल, असा समज सर्वसामान्यांचा होता. परंतु प्रत्यक्षात ही थाळी केवळ महापालिका कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादीत असून इतरांना कँटीनच्या ठरवलेल्या किंमतीतच थाळी विकत घ्यावी लागेल, हे समजल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला. 

हेही वाचा- तुम्हाला ‘इथं’ मिळेल १० रुपयांत जेवण, शिवसेनेची घोषणा प्रत्यक्षात

शिवाय या थाळी योजनेच्या उद्घाटनावरून शिवसेनेतील मतभेदही दिसून आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी थाळी योजनेचा शुभारंभ केला. त्यानंतर अर्ध्या तासानंतर आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना आणून पुन्हा या थाळीचे उद्घाटन केलं. यामुळे पालिकेत हा चर्चेचा विषय ठरला.

अशी थाळी पालिका कॅण्टीनमध्ये चार वर्षांपासून मिळत आहे, याची माहिती पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नसावी. म्हणूनच त्यांनी दोनदा त्याचं उद्घाटन केलं, असं म्हणत महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेनेला टोला लगावला.

गेल्या ४ वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी १० रुपयांना शाकाहारी थाळी मिळेल, असा फलक कँटीनमध्ये लागलेला आहे. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नव्हती. परंतु आता १० रुपयांत ही थाळी मिळू शकेल, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. या थाळीत दोन चपात्या, डाळ, भाजी आणि भात मिळतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा