Advertisement

देवनार डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा मिळेना

देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करून ११ वर्ष झाली आहेत. मात्र, या डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबई महापालिकेला पर्यायी जागा मिळालेली नाही.

देवनार डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा मिळेना
SHARES

देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करून ११ वर्ष झाली आहेत. मात्र, या डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबई महापालिकेला पर्यायी जागा मिळालेली नाही. त्यामुळे देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळावी, असा अर्ज मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात केला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकण्यात आल्याने देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. मात्र, त्यानंतर मुंबईतल प्रचंड कचऱ्याचा ताण एकट्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर पडू लागला. त्यामुळे न्यायालयाने पालिकेला दरदिवशी ६०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट देवनार डम्पिंग ग्राउंडवर लावण्याची परवानगी दिली. तसंच न्यायालयाने डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश पालिकेला दिले.

पालिका न्यायालयाकडून मागील ११ वर्षे देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी मुदतवाढ मागून घेत आहे. दरवर्षी ३१ डिसेंबरला ही मुदत संपते. मुंबईतील कचºयाचे प्रमाण वाढत असल्याने न्यायालयही मुदतवाढ देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने मुदतवाढीसाठी न्यायालयात अर्ज केला. महापालिका देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प राबवणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिला प्रकल्प उभा राहील व त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये दुसरा प्रकल्प उभा राहील, असं महापालिकेने अर्जात म्हटलं आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काय काय पावले उचलली, असा सवाल करत न्यायालयाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.हेही वाचा -

इंटरनेट सेवा बंद करण्यात भारत अव्वल

'एमएचटी सीईटी' परीक्षेची गुणपद्धती जाहीर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा