Advertisement

पश्चिम रेल्वेचा फुकट्यांना दणका, डिसेंबर महिन्यात ७ कोटींचा दंड वसूल


पश्चिम रेल्वेचा फुकट्यांना दणका, डिसेंबर महिन्यात ७ कोटींचा दंड वसूल
SHARES

लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांंकना पश्चिम रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. पश्चिम रेल्वेने २൦१७ च्या एकट्या डिसेंबर महिन्यात ७ कोटींचा दंड वसूल केला आहे. याचसोबत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात १ लाख ८३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय ७५८ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांना अटक करण्यात आली असून त्यांना देखील दंड आकारण्यात आला आहे. तर यामधील ८५ जणांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.


फुकट्यांना चाप

२൦१७ या वर्षी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फुकट्यांना चाप बसवण्यासाठी विशेष लक्ष दिलं आहे. हे प्रवासी सकाळी गर्दीच्या वेळी संधीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून अशा प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात आलं.


पश्चिम रेल्वेची ही मोहीम सुरूच

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात मोहीमच सुरू केली आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात,२൦१७ मध्ये, १२ वर्षांवरील ४९ शालेय मुलांना महिला डब्ब्यात प्रवास करताना पकडण्यात आलं आहे. शिवाय, तिकीट दलालांविरोधातही पश्चिम रेल्वेने कारवाई करत आतापर्यंत २५൦ व्यक्तींवर कारवाई केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा