Advertisement

लोकल सेवा सुरू झाली तरी, रेल्वे स्थानकांवर मर्यादित प्रवेश

रेल्वे स्थानकांतील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोडवर आधारित प्रवेशद्वार बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

लोकल सेवा सुरू झाली तरी, रेल्वे स्थानकांवर मर्यादित प्रवेश
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दी टाळणं बंधनकारक आहे. एखाद्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक जण एकत्र असल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्याता आहे. त्यामुळं मागील ५ महिन्यांपासून लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. परंतु, आता लोकल सुरू करण्यासाठी काही बदल होण्याची शक्यता आहे. अशातच रेल्वे स्थानकांतील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोडवर आधारित प्रवेशद्वार बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येईल. मेट्रो स्थानकाच्या धर्तीवर हे गेट काम करणार असल्याने अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. दरम्यान, वाहतूक क्षेत्रात विशेषत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत.

अनलॉकचा पुढील टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून विषेश हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई लोकलमधून रोज ८० लाख प्रवासी करतात. यापैकी ३५ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर प्रवास करतात.

चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्रवेश-निर्गमनद्वारावर क्यूआर प्रणालीवर आधारित दरवाजा बसविण्यात येणार आहे. खासगी कंपनीच्या मदतीनं पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांत क्यूआर आधारित दरवाजासाठी ११ ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली होती. याचा अहवाल लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांकडं सोपविण्यात येणार आहे. या अहवालाअंती स्थानकातील किती प्रवेशद्वारांवर ही यंत्रणा बसवण्यात येणार याबाबत माहिती मिळणार आहे. 



हेही वाचा -

राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्यास लोकल होणार सुरू

लोकलसेवा सुरू करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याची गरज


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा